समुद्रात ज्या प्रकारे लाटा उसळतात तसाच काहीसा प्रकार एका विहिरीत पाहायला मिळाला. गुजरातच्या मोरबी तालुक्यातील विरपार्दा गावातील ही घटना आहे. जिथे शेतातील एका विहिरीच्या पाण्यात लाटांसारखी हालचाल दिसल्याने गावकरी आश्चर्यचकित झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून हा विहिरीतील पाणी अशाप्रकारे हलताना
दिसत आहे. त्यामुळे गावात अनेक अफवा देखील पसरल्या असून अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत.












