Maharashtra Rain Update: राज्यात मागील काही दिवसांपासून जुलै महिन्याच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला असून बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस हीच स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, सोमवारी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर बहुतांश भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.












