आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे आपल्या धडक आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी हे कायमच चर्चेत राहिले आहेत. याच तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी आता बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल उभे राहिले आहेत. परेश रावल यांनी खास तुकाराम मुंढे यांच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केली आहे.














