‘दृश्यम’ चित्रपटातील कथानकालाही मागे टाकणारी एक धक्कादायक घटना बारामतीत घडली आहे. ‘दृश्यम’ चित्रपटात ज्याप्रमाणे मृतदेह लपवण्यासाठी पोलिसांच्या नकळत बांधकाम केल्याचं दाखवलं होतं, तसाच काहीसा प्रकार बारामती शहरातील जामदार रोडवरील एका सोसायटीत घडला आहे. एका 38 वर्षीय महिलेने आपल्या जिवंत पतीला गुंगीचं औषध देऊन जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी पोलिसांना आलेल्या एका अज्ञात फोनमुळे हा कथित कट उधळला गेला आहे. नेमकं घडलंय काय सविस्तर पाहू या.












