mithilesh desai: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची कन्या रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी (sarang lakhani) यांचा रिसेप्शन सोहळा नुकताच दिल्लीत (Delhi) मोठ्या थाटामाटात पार पडला. दिल्लीसह देशभरातली अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी या सोहळ्याला हजरी लावली होते. तसेच विविध क्षेत्रातील मंडळींनी देखील या सोहळ्याला हजरी लावली होते. या सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, या व्हिडीओमध्ये ‘फणस किंग’ म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई (mithilesh desai) हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.










