Ghatkopar Landslide : मुंबईतील घाटकोपर भागात मध्यरात्री तीन-साडेतीनच्या सुमारास दरड कोसळली आहे. चिराग नगर येथील गौशिया चाळीवर ढिगारा कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पालिकेचे अग्निशामक दल, पोलीस, वॉर्ड कर्मचारी, संबंधित वीज वितरण कंपनी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.










