Aaditya Thackeray: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी येथील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न चित्रफितीद्वारे मांडणाऱ्या स्मिता आणि आदित्य या विद्यार्थ्यांची शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट गावात जाऊन भेट घेतली. आपल्या परिसरातील समस्या धाडसाने मांडल्याबद्दल त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.














