ख्रिस्तोफर नोलानच्या ओडिसीच्या निमित्ताने ‘ग्रीस आणि भारतीय मायथॉलॉजीमधील साम्यस्थळं’ या विषयावर आयोजित ‘लोकसत्ता मुक्तसंवाद’ अलीकडेच पार पडला. मिथकं ही खूप छान आणि कल्पनेच्या पातळीवर अद्भूत अशी असतात. त्यात असलेल्या कथा माणसांच्याच असतात, पण आपल्याकडे मात्र आपण त्यातील व्यक्तिरेखांना देवत्व देतो आणि मोकळे होतो, तिथेच आपली अडचण आहे. सुरुवातील या मिथकांमध्ये धर्म येतो आणि पाठोपाठ देवत्व… तिथे चांगले मुद्दे मागे पडतात आणि संस्कृतीचा प्रवाह खुंटतो…, असं प्रतिपादन लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. आवर्जून पाहावा असा लोकसत्ता- मुक्तसंवाद…










