मुंबईमधील ताडदेव परिसरातील एका इमारतीमध्ये विक्रीसाठी असलेल्या फ्लॅटची जाहिरात करताना एका प्रॉपर्टी एजंटने केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद पेटला होता. ‘मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही’ अशा आशयाची जाहिरात प्रॉपर्टी एजंट भावेश कावरेने केली होती. या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भावेश कावरेने स्पष्टीकरणही दिलं होतं. मात्र, या जाहिरातीनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर हे सगळं प्रकरण अंगाशी आल्यानंतर भावेश कावरेन थेट मनसे नेते अमित ठाकरेंची भेट घेऊन मुंबईकरांची माफी मागितली आहे.










