Mumbai: सध्या महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा विषय चर्चेत आहे. अनेक शाळकरी विद्यार्थी हे त्यांच्या गावातील रस्त्यांची दुरावस्था व्हिडीओच्या माध्यमातून दाखवत आहेत. कोंदिवडे गावातील विद्यार्थिंनी देखील त्यांच्या गावातील रस्त्यांची दुरवस्था व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली. कोंदिवडे गावातील या विद्यार्थिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. रस्त्यांची दुरावस्था दाखवणाऱ्या विद्यार्थिंनीनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.












