परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर असतो अभ्यास, मेहनत आणि भविष्यातील नोकरीचं स्वप्न… पण याच परीक्षेत जर कधी पेपरफुटीचा आरोप होतो, तर कधी परीक्षा केंद्रावरच सर्व्हर डाऊन होतो… आणि आता तर थेट हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेतच तांत्रिक गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये काल परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला… की-बोर्ड खराब, संगणक बंद, सर्व्हरमध्ये बिघाड आणि अनेक विद्यार्थ्यांचं लॉगिनच न झाल्याचा दावा करण्यात आला. नेमकं काय घडलं? पाहा









