Nepal Political Crisis: एक रॅपर, स्ट्रक्चरल इंजिनिअर आणि काठमांडूचे महापौर राहिलेले बालेन शाह यांनी ‘जेन झी’ लाटेवर स्वार होत नेपाळचं सरकार उलथवून टाकलं होतं. मात्र, ज्या तरुण पिढीने त्यांना सत्तेवर आणलं त्याच जेन झीनं आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बालेन शाह यांनी जुन्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावत नेपाळची सूत्रं हाती घेतली पण, त्यांचा हा प्रभाव १५० दिवसांतच ओसरु लागला आहे.












