Amit Thackeray: वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘NEET’ च्या पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणामुळे नैराश्यात आलेल्या आकांक्षा चतुर्वेदी या १८ वर्षीय विद्यार्थिनीने नागपुरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. आकांक्षा ही नागपूर येथील एका नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटमधून ‘नीट’ परीक्षेची तयारी करत होती. २० मे रोजी तिने तिच्या खोलीत आत्महत्या केल्याचे समोर आले होते. अमित ठाकरे यांनी आकांक्षाच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी आकांक्षाच्या कुटुंबाचं सांत्वन केलं.












