Nepal Flood Update: पुण्यातील चार जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. मात्र,यात्रा पूर्ण करून माघारी येत असताना पुराच्या पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. तिबेटमधील जिलाँग शहरात हे चौघे अडकले असून चौघेही सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नेपाळच्या रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नेपाळ सीमेवरील आख्खं इमिग्रेशन कार्यालयच वाहून गेलं. त्यामुळे या यात्रेकरूंना परत येण्यासाठी रस्तेमार्गाचा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही,अशीही माहिती पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.









