भोंदूबाबा अशोक खरात यांचा कारनामे पुर्ण महाराष्ट्राने पाहिले अन् ऐकलेसुद्धा… नेतेमंडळीपासून ते सामान्यांपर्यत सर्व या अशोक खरातसमोर नतमस्तक व्हायचे. पण काही व्हिडीओ, फोटो अन् कारनामे समोर आल्यानंतर अशोक खरात थेट पोलीस कोठडीत अडकला आहे. अशोक खरातवर लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक, गैरप्रकार असे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशोक खरातविरोधात महिला लैंगिक अत्याचाराचे तब्बल ८ गुन्हे दाखल असून, यापैकी ६ गुन्ह्यांची आरोपपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. तर आणखी दोन गुन्ह्यांची आरोपपत्रे दाखल होणे बाकी आहे. यापैकीच एका खटल्यात आरोपी अशोक खरातला जामीन हवा होता. त्यावरच आज सुनावणी झाली अन् सरकारी वकील उज्जल निकम या पहिल्यांदाच या प्रकरणात बाजू मांडली. कोर्टात नेमकं काय घडलं पाहा…










