Vidyanand Bapat Pune: गणेशोत्सव २०२६ च्या पूर्वतयारीसाठी पुणे महानगरपालिकेत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांविरोधात पुण्यातील सजग नागरीक विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला.डीजे आणि लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली. परंतु, त्यांच्या या भूमिकेला विरोध करत गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.यामुळे बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर विद्यानंद बापट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.अशातच लोकसत्ताच्या मुलाखतीत विद्यानंद बापट यांनी “डीजेवर कारवाई झाली नाही तर काय करणार?” या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. तसेच ट्रोल करणाऱ्यांना देखील त्यांनी उत्तर दिलं आहे.











