ठाण्यातील मुंब्रा शहराने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम ऐक्य आणि बंधुत्वाचा संदेश दिला आहे. मुंब्र्यातील शंकर नगर परिसरातून भिवंडीतील पद्मानगर येथील गणेश मंडपाकडे २० फूट उंच गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॉलीचं दाभोळकर नाक्यावर अचानक चाक तुटलं. त्यामुळे ट्रॉलीचा तोल जाऊन गणेशमूर्ती पलटी होण्याचा आणि मोठं नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र हा तरुणांच्या सजगतेमुळे हा अनर्थ टळला.












