Amit Thackeray Pune: पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला सोमवारी अमित ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्राचार्यांना महाविद्यालयातील कँटिनमधील जेवणाचा दर्जा, वसतिगृहातील स्वच्छता या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला. यावेळी प्राचार्यांच्या कार्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसेच्या कार्यकर्त्यांनी हटविला. अशातच आता महाविद्यालयाच्या आवारात बेकायदा प्रवेश करून गोंधळ घातल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.












