Pune News: मद्यधुंद अवस्थेतील एका कार चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून एका वाहनाला धडक दिल्यानंतर त्याची कार डिव्हायडर आदळली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत मद्यधुंद चालकाने भररस्त्यात धिंगाणा घातला. हा प्रकार पुण्यातील औंध-हिंजवडी बीआरटी मार्गावर रविवारी घडला.








