एसआयआर मोहिमे अंतर्गत प्रारूप यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये आपलं नाव कसं शोधावं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजून घेऊ या. ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या प्रारूप यादीच नाव आहे की नाही, याची माहिती आयोगाने दिलेल्या वेबसाईटवर बघता येणार आहे. ceo.maharashtra.gov.in, voters.eci.gov.in यावर मतदारांना आपले नाव शोधता येणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या भागातील बीएलओंकडे यादी असेल. त्यांच्याकडूनही याची माहिती घेता येईल.








