Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते हळूहळू पुढे सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या वादळी पावसाची नोंद होत आहे. हे क्षेत्र छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमधून पुढे सरकत असून या राज्यांच्या लगतच्या प्रदेशावरही वादळी पावसाचा प्रभाव आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात रविवारपासून पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा इशारा दिला आहे.









