उद्धव ठाकरेंनी पक्षातंर्गत निवडणुका घेतल्या नाहीत, असा दावा करत शिंदेंच्या वकिलांनी ठाकरेंना कोर्टातच घेरण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष निवडणुकीतच गैरप्रकार घडल्याने ठाकरेंच्या माणसावर अपात्र होण्याची वेळ आलीय. या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी घडल्याने ठाकरेंना चांगलाच झटका बसलाय. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाही. निवडणूक आणि राजकीय पातळीवर हा संघर्ष सुरुच आहे. पण कोर्टातही हे दोघे नेहमीच भिडताना दिसतायत. पक्षाच्या वाद कोर्टात सुरु असताना, ठाकरेंच्या मुंबईतील नगरसेविका विशाखा राऊत यांचं जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणही कोर्टात गेलं होतं. मुंबईतील दादर भागातील नगरसेविका विशाखा राऊत यांनी ओबीसी महिला या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अन् त्या २०० मतांनी जिंकल्या होत्या. त्याविरोधातल तक्रार झाल्यानंतर पालघरच्या जातपडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं, त्यामुळे विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद धोक्यात आलं होतं.













