Solapur Crime: सोलापुरात माजी नगरसेवक लालचंद वाधवानी यांच्यावर भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हातात धारदार शस्त्र घेऊन आलेल्या हल्लेखोराने लालचंद वाधवानी यांच्यावर वार केले आणि त्यानंतर दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या लालचंद वाधवानी यांच्यावर आसरा चौक परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.










