Pune News: पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरात दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर लोखंडी कमान खाली उतरवत असताना ती अंगावर कोसळल्याने 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.













