शिवसेनेच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झाल्याची घोषणा अखेर सोमवारी महापौर रितू तावडे यांनी महापालिका सभागृहात केली. पालघर जिल्हा जात पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर आणि राज्य सरकारने अपात्रतेची घोषणा केल्यानंतर राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात आलं होतं. आता या प्रकरणात समाधान सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशाखा राऊत स्वतःला वाचवण्यासाठी २० नगरसेवक फोडण्याच्या तयारीत होत्या असं समाधान सरवणकर म्हणाले.












