Sanjay Raut: गरबा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशी भूमिका भाजप नेते नितेश राणे यांनी मांडल्यानंतर या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी चंद्रपुरात याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. गरबा हा सर्वसमावेशक उत्सव असून, एखादी मुस्लिम व्यक्ती गरबा पाहण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी कार्यक्रमात येत असेल, तर त्यात गैर काहीही वाटत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. धर्म घरात पाळावा सार्वजनिक ठिकाणी पाळू नये असेही त्या म्हणाल्या. अमृता फडणवीस यांच्या या विधानावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.











