Maharashtra weather Update: पुढील आठवड्यात राज्यातील घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणपतीचे आगमन होणार आहे. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवावर पावसाचे सावट असल्याचे चित्र असून, राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.













