Bhandara Lakhani Accident: भंडारा जिल्ह्यात आज पहाटे भीषण अपघात झाला. नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथे ट्रक आणि पिकअप वाहनाची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी हे छत्तीसगडमधील मजूर असल्याची माहिती आहे.














