रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत खासगी रुग्णालये कशी अवाढव्य कमाई करतात, याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ११.०५ रुपयांना खरेदी केलेला ‘IV सेट’ (सलाईनची नळी) रुग्णांच्या माथी तब्बल ३२५ रुपयांना मारला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी आणि विक्री किमतीत तब्बल २,८४१ टक्क्यांपर्यंतचा नफा कमावला जात असल्याचे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पाहणीत आढळले आहे. यावर तीव्र आक्षेप घेत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारच्या ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी’ (NPPA) आणि औषध विभागाला पत्र लिहून या प्रकारावर तातडीने नियमन आणण्याची आणि ‘ट्रेड मार्जिन’वर मर्यादा घालण्याची शिफारस केली












