Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. १९ सप्टेंबरला ते मुंबईतल्या आझाद मैदानावर येऊन आंदोलन करणार आहेत. त्यासाठी ते आंतरवली सराटीतून निघाले आहेत. त्यांचा पहिला मुक्काम पाटोदा या ठिकाणी होता. मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी पाटोद्याहून निघताना मला समाजासाठी मरू द्या असं भावनिक आवाहन केलं. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.












