देशभरात गेल्या दोन दिवसांपासून ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ म्हणजेच यूपीआय व्यवहारांवर व्यापाऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. तुमच्यापर्यंत देखील ही बातमी पोहोचली असेल. एनसीपीआय म्हणजेच National Payments corporation of indiaने याबाबतचा निर्णय जाहीर केल्यापासून नागरिक, व्यापारी, ऑनलाइन पेमेंट कंपन्या आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, विरोध होत असतानाही सरकार आपल्या निर्णयावर का अडून आहे? यामुळे कोणाला किती आणि कसा फायदा होणार? सर्वसामान्यांना काय फटका बसू शकतो? सविस्तर अपडेट पाहू या.








