Nanded: नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात पावसाने दीड-दोन महिन्यांपासून दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाअभावी सोयाबीन आणि कापसाची पिकं शेतातच करपली आहेत. अशातच आता प्रशासकीय पाहणी आणि बैठकींवर संतप्त शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे.“अधिकाऱ्यांनी संपूर्ण शेतात फिरून एक किलो सोयाबीन काढून दाखवावा, बदल्यात काजू-बदाम देऊ,” असा आव्हान शेतकऱ्यांने प्रशासनाला दिलं.










