अनुदानित दरात घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गॅस सिलिंडर बूक करताना आता ग्राहकांना बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण करावं लागणार आहे. तसं न केल्यास सिलिंडर बूक होणार नाही. १ ऑक्टोबर पासून हा नवा नियम लागू होणार आहे. पण, हे ऑथेंटिकेशन नेमकं कसं करायचं? मोबाईलवरून ते करता येतं का, कोणाला यात सवलत मिळणार? आणि ऑथेंटिकेशन केलं नाही, तर सिलिंडर मिळणार नाही का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ.













