Maharashtra weather update: देशातून नैर्ऋत्य मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे.राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. १७ सप्टेंबरच्या आसपास सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा काहीशी उशिराने सुरू झाली आहे.मात्र,मान्सूनची माघार सुरू असतानाच बंगालच्या उपसागरात नव्या हवामान प्रणालीची निर्मिती झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव अद्याप कायम असून, पुढील दोन दिवस राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.











