ज्या गणरायाची मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना केली जाते,त्याच गणरायाच्या मूर्ती भंगलेल्या आणि अत्यवस्थ अवस्थेत मुलुंड येथील डम्पिंग ग्राऊंड परिसरात दिसून आल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला. गणेशमूर्तींची झालेली अवस्था पाहून त्यांनी प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.तसेच त्यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली.











