IIT Bombay Sahil Death: आयआयटी मुंबईतल्या २२ वर्षीय साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर राज्यभरात संताप व्यक्त होतो आहे आणि या घटनेची चर्चाही रंगली आहे. दरम्यान, साहिल वाकोडेचे वडील रविंद्र वाकोडे यांनी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तसंच संचालक शिरीष केदारे यांची त्यांना साथ आहे असंही रविंद्र वाकोडे यांनी म्हटलं आहे.










