Pandharpur Love Story crime : एक ६८ वर्षीय वृद्ध महिला तिचा ७० वर्षांचा बॉयफ्रेंड, १० वर्षांचे प्रेमसंबंध, प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात पण या लव्ह स्टोरीचा शेवट मात्र थरारक झाला. ६८ वर्षीय मंगल या माहिलेने आपल्या ७० वर्षांच्या अंबादास या तिच्या प्रियकराची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून समोर आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर रॉकेल ओतून पेटवून देण्यात आला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत तो मृतदेह शेतातील विहिरीत फेकून देण्यात आला.








