राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर मंत्री, नेते मंडळी हे शेतकऱ्यांच्या बांधावर दिसत आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर-बोदवड परिसरातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात वाहन चोरी आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणातील संशयित आरोपी दिसून आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला आहे.














