Maharashtra Weather Update: राज्यात मागील काही दिवसांपासून वादळी पावसाच्या प्रभावामुळे तुरळक ठिकाणी पावसाची नोंद होत असली तरीही या दरम्यान सर्वदूर पावसाचा अभाव असल्याचे पावसाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. दरम्यान, वादळी पावसाचा प्रभाव हळूहळू ओसरत असून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे असून राज्यातील अनेक भागात सध्या उकाड्यात वाढ झाली आहे. पुढील काही दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. अशातच राज्यातील कोणत्या भागांना आज हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे, हे जाणून घेऊयात..














