Pradeep Purnekar: ठाण्यातील घोडबंदर येथील मानपाडा भागात शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची त्यांच्याच कार्यालयात गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हत्याकांडानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून मारेकऱ्यांना अटक करुन कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडानंतर मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर भागातील नागरिक मोठ्याप्रमाणात प्रदीप पूर्णेकर यांचा मृतदेह ठेवण्यात आलेल्या रुग्णालयाबाहेर जमले होते.















