ठाण्यातील हत्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ माजली आहे. ठाण्याच्या मानपाडा येथील मनोरमानगर परिसरात मंगळवारी रात्री ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पाच जणांनी चार राऊंड फायर करत पूर्णेकर यांचा जीव घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे. या घटनेनंतर पूर्णेकर यांच्या हत्येपूर्वीची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. तर संपूर्ण घटनेसंदर्भात पूर्णेकर यांच्या मुलाने कोणाची नावं घेतली आहेत. त्याबद्दलची अपडेट आपण पाहणार आहोत.












