पुण्यात सध्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. विविध राजकीय पक्षातील नेते मंडळी आंदोलनस्थळी भेट देत आहेत. यावेळी शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील आंदोलनस्थळी दाखल झाले होते. ओमराजे भाषण करताना विद्यार्थ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली तेव्हा इथे आलो आपलं काही चुकलं? असा प्रश्न निंबाळकरांनी विचारला. तर शिंदेंना फोन लावून एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा मागा, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.










