पुण्यात एमपीएसची विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. रोहित पवार यांच्यासह अनेक नेते मंडळी या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. रविवारी रात्री काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले. दरम्यान, सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असतानाच अभिजीत दिपकेंची एन्ट्री झाली. यावेळी अंधारेंनी दिपकेंच्या हाताला धरून पुढे आणलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला.









