ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीवरही शोककळा पसरली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी पहाटे राहत्या घरी नानांना हृदयविकाराचा (कार्डियाक अरेस्ट) तीव्र झटका आला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या गोव्यातील निवासस्थानी वैद्यकीय पथक आलं होतं. वैद्यकीय पथकाने तातडीने नाना पाटेकर यांना मणिपाल रुग्णालयात नेलं.










