गोष्ट २०२४ आहे. तेव्हा चर्चा होती अन् तशा बातम्याही आल्या की, नाना पाटेकर हे निवडणूक लढवू शकतात. नानाची शेती आणि फार्म हाऊस ज्या मतदारसंघात आहे. त्या खडकवासला मतदारसंघातून ते उमेदवार घेतील अशी चर्चा होती. नाना पाटेकर राजकारणात येऊ शकतात. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे राजकीय वर्तुळात त्यांचा असलेला वावर आणि राजकीय नेत्यांसोबतची मैत्री… नेत्यांना ते नावाने हाक मारायचे अन् नाना पाटेकर हे एकमेव अभिनेते होते, जे राजकारण्यांना जाहिरपणे थेट प्रश्नही विचारायचे अन् धारेवरही धरायचे.. शिवाय २०१५ नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम सुरु केल्यामुळे ते भविष्यात राजकारणात येऊ शकतात. असंच अनेकांना वाटत होतं. पण नाना पाटेकरांनी पुढे येऊन थेट या सर्व अफवा असल्याचं म्हटलं. याच प्रश्नावर नाना २०२४ मध्ये काय म्हणाले होते पाहा…










