Kailas Gorantyal: जालना शहरात भजनाच्या कार्यक्रमादरम्यान भाजपचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री मंमादेवी मंदिर परिसरात आयोजित भजन कार्यक्रमात गोरंट्याल यांनी भजनाच्या तालावर ठेका धरला. याचवेळी त्यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आली. जालना येथील कार्यक्रमामधील गोरंट्याल यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असताना दुसरीकडे माजी आमदारांवर अशा प्रकारे नोटा उधळल्या जात आहेत, असं म्हणत अनेकांनी कैलास गोरंट्याल यांच्यावर टीका केली. अशातच आता या व्हायरल व्हिडीओवर कैलास गोरंट्याल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.










