मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारलं होते. या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खानही उपस्थित होता. याचाच मोठा फटका आता इम्रान खानला बसला असून त्याच्यावर थेट देश सोडून जाण्याची वेळ आली. मुंबई पोलिसांनी त्याला तशी नोटीस बजावल्याची माहिती आहे. तो ओसीआय कार्डधारक आहे अशी तक्रार करण्यात आली होती. ही तक्रार कोणी केली? ओसीआय म्हणजे काय? सगळं प्रकरण सविस्तर पाहु या.










