Ankita Bhandari: अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरण तिच्या आई वडिलांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अंकिता भंडारी या उत्तराखंड मध्ये राहणाऱ्या तरूणीची २०२२ मध्ये हत्या करण्यात आली. या प्रकरणात भाजपाचे नेते दुष्यंत गौतम यांचंही नाव नंतर समोर आलं. आम्हाला न्याय हवा आहे या मागणीसाठी तिचे आई वडील इंडिया गेट या ठिकाणी आंदोलनाला बसले होते. त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला. पहाटे चारच्या दरम्यान दिल्ली पोलिसांनी या दोघांसह आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. आम्हाला न्याय हवा आहे ही मागणी तिच्या आई वडिलांनी केली आहे.










