Tukaram Mundhe: अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात कारवायांचा धडाका लावला आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यभरात एफडीएकडून भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची देशभरात चर्चा सुरू असून त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.दरम्यान आज तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठी घोषणा केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आता मसाल्यांबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. आता मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग मिसळवता येणार नाही. मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग मिसळल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याचा इशारा मुंढे यांनी दिला आहे. ते काय म्हणाले ते पाहूयात…












