Pakistan Khawaja Asif Post: भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. गेल्या चार वर्षांत तब्बल २९ लाख लोकांनी पाकिस्तान सोडून विदेशात पलायन केल्याचे समोर आले आहे. त्यातील बहुतांश जणांनी इतर मुस्लिमबहुल देशांत आश्रय घेतल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी या स्थलांतराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या पाठोपाठ अनेक सरकारी अधिकारीही सेवेत असतानाच परदेशात धूम ठोकण्याच्या तयारीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही अधिकाऱ्यांनी यासाठी आधीपासूनच नियोजन केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.






















